टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या सगळीकडे सणासुदींची धूम सुरू आहे. त्याचबरोबर वस्तूंच्या खरेदीसाठी विक्रीचा सगळीकडे जोर वाढला आहे. अशा परिस्थितीत लोकल मार्केट पासून ऑटोमोबाईल सेक्टर पर्यंत प्रत्येक जण आपले नवीन नवीन प्रॉडक्ट मार्केटमध्ये लाँच करत आहे. रोज नवनवीन कार आणि बाईक मार्केटमध्ये येत आहे.
जर तुम्ही बाईक प्रेमी असला आणि नवीन बाईक घ्यायचा विचार करत असला तर ऑक्टोबर तुमच्यासाठी आकर्षक बाईक घेऊन येत आहे. चला, जाणून घेऊया या येणाऱ्या नवीन बाईक बद्दल :
ऑक्टोबरमध्ये लॉंच होणाऱ्या बाईक
Royal Enfield Super Meteor 650
Royal Enfield लवकर आपले Super Meteor 650 मॉडेल लाँच करणार आहे. या बाईक मध्ये 648cc, एअर आणि ऑईल-कुल्ड पॅरेलेल ट्वीन इंजिन आहे. जे मॅक्झिमम 47bhp आणि 52Nm टार्क निर्माण करू शकते. ही बाईक 6- स्पीड गेअरबॉक्ससह मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. या गाडीची किंमत 3.35 लाख रुपये असू शकते. 20 ऑक्टोबर 2022 रोजी Royal Enfield ही बाईक लाँच करणार आहे.
Bajaj Pulsar N150
Bajaj Pulsar N150 बजाजची ही नवी बाईक एका नवीन प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आलेली आहे. या येणाऱ्या नवीन बाईकचे बॉडीवर्क आणि इन्स्ट्रुमेंट कॉर्टर लिटर बाईकप्रमाणे असू शकते. Bajaj Pulsar N150 ही बाईक 5 ऑक्टोबर 2022 रोजी बाजारात लाँच होणार आहे. या बाईकची किंमत 1.10 लाख असण्याची शक्यता आहे.
Honda Rebel 500
Honda ची Honda Rebel 500 15 ऑक्टोबर 2022 रोजी मार्केटमध्ये लाँच होऊ शकते. या बाईकच्या इंजिन बद्दल बोलायचे झाले तर, या बाईकमध्ये 471cc लिक्विड कूल्ड पॅरेलेल ट्वीन इंजिन आहे, जे 46.2PS पॉवर आणि 43.3Nm टार्क जनरेट करू शकते. या बाईकमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्ससह स्लीपर क्लच दिल्या जाण्याची शक्यता आहे.
Suzuki V-Strom 1050
या फेस्टिव्ह सीजन मध्ये सुझुकी देखील आपली Suzuki V-Strom 1050 बाईक 5 ऑक्टोबर 2022 ला लॉन्च करू शकते. यात 1,037 cc V-ट्विन इंजिन मिळेल, जे 105 bhp ची कमाल पॉवर जनरेट करते. या बाईकची किंमत 14 ते 15 लाख असू शकते.
महत्वाच्या बातम्या
- Girish Mahajan | फडणवीसांच्या कानात सांगितल्याचा ‘तो’ दावा एकनाथ खडसेंनी नाकारताच गिरीश महाजनांनी दिलं आव्हान, म्हणाले…
- Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या आरोपीला अखेर अटक, धमकी देण्याचं कारण देखील आलं समोर
- Chandrasekhar Bawankule । “नाना पटोलेंनाच लम्पी आजार झालाय, त्यांनी…”; बावनकुळेंचा पलटवार
- IND vs SA: T20 फॉरमॅटमध्ये सूर्यकुमार ठरला सर्वात जलद हजार धावा करणारा पहिला खेळाडू
- Cold And Cough | लहान मुलांना सर्दी खोकला झाला असेल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय