नाशकात शिवसेनेला मोठे भगदाड ? ३० नगरसेवक बंडाच्या तयारीत ?

टीम महाराष्ट्र देशा : नाशिक महापालिकेत शिवेसेनेत बोरस्ते, बडगुजर, शिंदे यांच्या व्यतिरिक्त कोणालाच पदे दिली जात नाहीत. यावरून गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेत एकसंध असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेत ठराविक चौकटीत पदांचे वाटप केले जाते, असा आरोप करत 30 ते ३२ नगरसेवकांनी बंडाचे निशाण फडकविण्याची तयारी सुरू केली आहे. साधे निवेदन द्यायचे असले तरी परवानगी घ्यावी लागते.

महासभेत मोकळेपणाने भूमिका मांडता येत नाही. बोरस्ते, बडगुजर यांचे एकमेकांमध्ये भांडण दिसत असले तरी आतून दोघेही एकच आहेत. नगरसेवकांची दिशाभूल केली जाते,अशा तक्रारी घेऊन शिवसेना नगरसेवक बंडाच्या तयारीत असल्याची माहिती मिळते आहे.

Loading...

आपली खदखद नेमकी कोणाकडे, व्यक्त करायची याचा निर्णय घेण्यासाठी एका नगरसेवकाच्या निवासस्थानी बुधवारी सायंकाळी बैठक झाली. बैठकीत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर व गटनेते विलास शिंदे यांच्यावर प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला.सत्यभामा गाडेकर यांचे नाव स्थायी समितीवर ऐनवेळी आले, त्यातही या त्रिकुटाच्या मर्जीतूनच गाडेकर यांचे नाव आले. त्यापूर्वी शिवसेनेत जे काही निर्णय झाले, त्यात नगरसेवकांना विचारात न घेता परस्पर एकाधिकारशाहीने घेतले गेले. पक्षाचे वरिष्ठ नेते नाशिकमध्ये आल्यास त्यांना भेटण्यासाठी स्थानिक नेत्यांचे अडथळे पार पडावे लागतात.महापौर, उपमहापौर निवडणुकीत सत्तेची गणिते जुळून आली असताना एक तास आधी काय घडले, याची माहिती अद्यापही नगरसेवकांना का दिली जात नाही,”अशा शिवसेना नगरसेवकांच्या तक्रारी आहेत.

महापालिका स्थायी समितीच्या नियुक्तींतून भाजपला घेरणाऱ्या शिवसेनेला स्वतःच्याच नगरसेवकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे. वारंवार ठराविक लोकांनाच पदे मिळत असल्याने असंतोषाचा भडका उडाला आहे. तीस नगरसेवकांनी वेगळी बैठक घेऊन खलबते केली. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांविरोधात बंडाची चिन्हे आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश