विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात मुखदर्शनाची नवी व्यवस्था

blank

टीम महाराष्ट्र देशा : मुखी हरिनामाचा गजर करत संत ज्ञानेश्वर महाराजांची व संत तुकोबांची पालखी एक-एक टप्पा पार करत पंढरपूरकडे मार्गस्त होत आहे. त्याचप्रमाणे संत निवृत्तीनाथ, संत एकनाथ, संत मुक्ताई यांच्यासह संत गजानन महाराज या पालख्यादेखील पंढरपूरच्या दिशेने जात आहे.

अखेर काही दिवसांवर आषाढी एकादशी आली आहे. याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची पाऊले पंढरपुराच्या दिशेने जात आहे. सावळ्या विठुरायाच रूप पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होत आहे. सुमारे दर्शनासाठी १९-२० तास भाविकांना दर्शनरांगेत थांबावे लागत आहे. मात्र गर्दीच्यावेळी विठुरायाच्या दर्शनासाठी दर्शनरांगेत उभं राहणं ज्या भाविकांना शक्य नसतं. असे भाविक विठुरायाच्या मुखदर्शनासाठी गर्दी करतात.

याच पार्श्वभूमीवर विठुरायाच्या मुखदर्शनासाठी मंदिर समितीने नवी व्यवस्था केली आहे. सिंहगड इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांनी मुखदर्शनासाठी नवीन पायऱ्यांचा लाकडी प्लॅटफॉर्म डिझाईन करुन बसविल्याने आता मुखदर्शनासाठी येणार भाविक या पायऱ्यांवर चढून देवाचे नीट दर्शन होणार आहे.

मुखदर्शनासाठी मंदिर समितीने केलेल्या नवीन व्यवस्थेमुळे भाविकांना देवाचा चेहरा दिसू लागल्याने भाविक सुखावला आहे.