आंबेगाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

टिम महाराष्ट्र देशा : आंबेगाव तालुक्यातील चारही ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.आंबेगाव तालुका कायमचं दिलीप वळसे पाटील यांच्या विचारांना माननारा आणि विकासाला मतदान करणारा आहे. तेच चित्र आज निकाल लागलेल्या ग्रामपंचायत निकालावरून स्पष्ट होते.

अवसरीं,पारगाव,लोणी, टाव्हरेवाडी या महत्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली. विद्यमान जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या गटातील ही चारही गावे अतिशय महत्वाची समजली जातात. हा विजय नक्कीच येणाऱ्या काळात महत्वाचा असणार आहे.अवसरींमध्ये सरपंच म्हणून पवन हिले पारगाव मधे बबन ढोबले टाव्हरेवाडी मधे उत्तम टाव्हरे तर लोणी मधे उर्मिला धुमाळ हे सर्व राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत.

You might also like
Comments
Loading...