निकालानंतर पेढा भरविण्याऐवजी ‘मीच पुन्हा, मीच पुन्हा’, असा धडाका त्यांनी लावला होता 

Sanjay-Raut

टीम महाराष्ट्र देशा : ‘ विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांना पेढा भरवायला हवा होता. महाराष्ट्राच्या संस्कृतीची ही दिलदारी त्यांनी दाखवायला पाहिजे होती. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन पत्रकार परिषद घेतली असती तर सगळ्यांचीच दिवाळी आनंदात गेली असती,’ असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. एका वृत्तवाहिनीला दलेल्या या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

राऊत म्हणाले की, ‘विधानसभा निवडणुकीचा जाहीर झाल्यानंतर भाजपकडून काहीच हालचाल झाली नाही. केवळ ‘मीच पुन्हा, मीच पुन्हा’, असा धडाका त्यांनी लावला होता. पण तुम्हीच पुन्हा येण्यासाठी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा तर करायला पाहिजे होता, असा टोलाही राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.यावेळी राऊत यांनी शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद पाहिजेच असल्याचे ठामपणे नमूद केले. महाराष्ट्रात ठरल्याप्रमाणे पहिल्या अडीच वर्षांमध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. तसेच २०१९ मध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होणार, असं कुठे घटनेत लिहून ठेवलेले नाही, असे राऊत यांनी सांगितले.

Loading...

दरम्यान, मुख्यमंत्री पदासाठी भाजप शिवसेनेतील संघर्ष शिगेला पोहचला आहे. भाजपवर टीका करण्याची एकही संधी राऊत सोडताना दिसत नाहीत. रविवारी त्यांनी शायर वसीम बरेलवी यांचा ‘उसूलों पर जहाँ आँच आये, टकराना ज़रूरी है जो ज़िन्दा हो, तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है…’ हा शेर ट्विट करत भाजपाला टोला लगावला होता. तर आज मुख्यमंत्री दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटायला जात असताना त्यांचा आणि शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकत्र चालताना फोटो आहे. या फोटोला त्यांनी ”जय हिंद” असे कॅप्शन दिले आहे. तसेच या फोटोवर ‘लक्ष्य तक पहुंचने से पहले सफर में मजा आता है’, असे वाक्य लिहिलेले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
#corona : केवळ लॉकडाऊन पुरेसे नाही, WHOने सुचवला आणखी एक पर्याय