४ महिन्यात पीएमटीच्या सेवेत नवीन ८०० बस दाखल होणार

pmpl

पुणे : भविष्यात पुणेकरांना पीएमपीएलची चांगली सेवा देण्यासाठी संचालक मंडळाने आस्थापना आराखड्याला मान्यता दिली आहे. त्यानुसार येत्या ४ महिन्यात नवीन ८०० बस पीएमटीच्या सेवेत दाखल होणार आहेत. तसेच पीएमपीएलमध्ये विविध विभागाची वाढ होणार आहे. त्यासाठी नव्याने अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली जाणार असल्याची माहिती पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी दिली.यावेळी मुंढे पुढे म्हणाले की, सध्या कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर या नुतन आराखड्याचा कोणताही परिणाम होणार नाही. त्याचबरोबर त्याच्या सेवाज्येष्ठता आणि वेतनातही कोणते बदल केले जाणार नाहीत. तसेच तर येत्या चार महिन्यात नवीन आठशे बस पीएमटीच्या सेवेत दाखल होणार असून त्याचे टेंडरही काढले जाणार आहे. विशेष म्हणजे डिझेलचे प्रमाण कमी करण्यासाठी यामध्ये ४०० बस या सीएनजीच्या असतील, तर बाकी बस डिझेलवर चालणाऱ्या असणार आहेत. सीएनजी गॅस बाबतीत एमएनजीएलशी चर्चा सुरु असून काही ठिकाणी गॅस भरण्यासाठी डेपोमध्ये नवीन पंपस्टेशन उभी करण्यात येणार आहेत.