केंद्र सरकारकडून साखर उद्योगाला 4500 कोटींचं पॅकेज जाहीर

नवी दिल्ली – 2019 च्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योजकांना खुश केलं आहे. अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगासाठी केंद्रीय मंत्रालयाने तब्बल 4500 कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर केलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थ मंत्रालयाने अन्न पुरवठा खात्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

या निर्णयामुळे साखरेचे उत्पादन वाढीस लागणार असून मोठ्या प्रमाणात साखर निर्यात करण्यात येईल. विशेष म्हणजे साखर निर्यातासाठी साखर कारखानदारांना अनुदान देण्यात येणार आहे. सन 2018-19 या वर्षासाठी 5 दशलक्ष म्हणजेच 50 लाख टन साखर निर्यातीवर कारखानदारांना अनुदान देण्यात येणार आहे. 13.88 रुपये प्रति क्विंटलच्या हिशोबाने हे अनुदान देण्यात येईल.

अखेर पीएमपी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; ८.३३ टक्के बोनस देण्यास संचालक मंडळाची मंजुरी 

सत्ता आली पण; आदिनाथच्या कामगारांचे भवितव्य आजही अंधारातच