Hero Glamour- नवीन हिरो ग्लॅमर १२५चे आगमन

हिरो मोटोकॉर्प कंपनीने आपल्या हिरो ग्लॅमर १२५ या बाईकची नवीन आवृत्ती ६५७०० रूपयात भारतीय बाजारपेठेत उतारली आहे.

Loading...

नवीन हिरो ग्लॅमर १२५ हे मॉडेल पहिल्यांदा जानेवारी महिन्यात अर्जेंटिनात प्रदर्शीत करण्यात आले होते. आता ही बाईक भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. याबाबत कंपनीने अधिकृत घोषणा केली नसली तरी देशभरातील डिलर्सकडे याची १८ एप्रिलपासून नोंदणी सुरू झाल्याचे वृत्त आहे. हे मॉडेल डिस्क, ड्रम आणि एफआय या तीन व्हेरियंटमध्ये ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. यात बीएस-४ या उत्सर्जनाच्या नव्या मानकाची पूर्तता करण्यात आली आहे.

 

या मॉडेलमध्ये १२४.७ सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर अ‍ॅडव्हान्स स्विर्ल फ्लो इंडक्शन सिस्टीम (एएफएसएफ) इंजिन प्रदान करण्यात आले आहे. यात हिरो कंपनीने विकसित केलेल्या आयडल स्टॉप-स्टार्ट प्रणाली म्हणजेच आय३एस प्रणालीने सज्ज असणारे चार गिअर्स देण्यात आले आहेत. या प्रणालीच्या मदतीने गाडी न्यूट्रल गिअरमध्ये असतांना आपोआप बंद होऊन नंतर ती सुलभपणे सुरू करता येते. यामुळे इंधनाची बचत होते. यातील ग्लॅमर ड्रम ब्रेक व्हेरियंटचे दिल्लीतील एक्स-शोरूम मुल्य ६५,७०० रूपये असून डिस्क ब्रेक व्हेरियंट ६७,७०० तर फ्युअल इंजेक्शन म्हणजेच एफआय व्हेरियंट ७६,७०० रूपयात ग्राहकांना खरेदी करता येईल.

नवीन हिरो ग्लॅमर एफआय

(Hero Glamour FI )

 

 

नवीन हिरो ग्लॅमर

Hero GlamourLoading…


Loading…

Loading...