गांभीर्य लक्षात घ्या : ‘या’ देशात मिनिटाला १३ कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत

इटली आणि स्पेनमध्ये कोरोनाने धुमाकूळ घातल्यानंतर आता अमेरिकेतही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये कोरोना विषाणूमुळे 345 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर येथे 18000 नवीन रुग्ण आढशून आले आहेत.

जगभरात कोरोनाने हातपाय पसरले आहेत.अमेरिकेला आता याचा मोठा फटका बसत आहे. अमेरिकेत दर मिनिटाला १३ कोरोनाचे रुग्ण आढळत आहे. अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १ लाखावर गेली आहे. अमेरिकेने चीन, इटली आणि स्पेनला मागे टाकले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर आज शनिवारी चौथा दिवस आहे. भारतात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारसह देशातील सर्व राज्य विशेष खबरदारी घेत उपाययोजना करत आहेत.नागरिकांना घरामध्येच राहण्याच्या वारंवार सूचना देवून देखील लोक अजूनही बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, आपल्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आज घडीला राज्यात 156 देशात 863 जण कोरोनाचे पॉझिटिव्ह आहेत. तर, आतापर्यंत 17 जणांचा यात बळी गेलाय. दिलायसादायक बाब म्हणजे यातील 73 जण पूर्णपणे बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.