घोटाळ्याचं समर्थन कधीच करणार नाही ; गडकरींच्या कोलांटउड्या

फरारी उद्योगपती विजय मल्ल्या बद्दलच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

टीम महाराष्ट्र देशा– केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कर्जबुडव्या विजय मल्ल्याची पाठराखण केल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. चौफेर टीका होऊ लागताच आता मंत्रीमहोदयांनी वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचं सांगत माध्यमांवर खापर फोडलं आहे. स्वत:च्या वक्तव्यावर गडकरी यांना स्पष्टीकरण द्यावे लागले असून ‘फरारी उद्योगपती विजय मल्ल्या याच्याबाबतचे माझे वक्तव्य मोडतोड करून प्रसिद्ध करण्यात आले,’ असे गडकरी यांनी म्हटलं आहे.

विजय मल्ल्या भारतीय बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून लंडनला पसार झाला असून लंडन कोर्टाकडून विजय मल्ल्यावरील प्रत्यार्पणाच्या कारवाईला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे थकित कर्जप्रकरणी लंडनमध्ये असलेल्या मल्ल्याला कोणताही दिलासा मिळालेला नाही अश्या पार्श्वभूमीवर मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी एखादा दुर्मिळ अपराध केल्याने लगेच एखाद्या व्यावसायिकाला ‘घोटाळेबाज’ म्हणणे योग्य नाही असे सांगत गडकरींनी मल्ल्याला क्लीन चिट दिली होती.

 

विजय मल्ल्याची भलामण केल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना गडकरी यांनी वक्तव्याचा विपर्यास केला गेला असल्याचं म्हटलं आहे. ‘विजय मल्ल्याने काही चुकीचे केले असेल तर त्याची चौकशी सुरू असेल ती चौकशी योग्यच आहे, असे मी म्हणालो होतो. मल्ल्याचे खाते ४० वर्षे सुरळित होते आणि ४१ व्या वर्षात ते बुडाले. व्यवसायात चढउतार येत असतात. माझी दोन्ही विधाने संदर्भ सोडून प्रसिद्ध करण्यात आली असं गडकरींनी म्हटलं आहे.

You might also like
Comments
Loading...