मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा कधी केलाच नव्हता : महापौर पेडणेकर

mumbai flood

मुंबई : पहिल्या पावसाचा फटका मुंबईतील लोकल सेवेसह लांब पल्ल्यांच्या गाड्यांना बसला. मध्य रेल्वेच्या सायन रेल्वे स्टेशन आणि हार्बर मार्गावरील जीटीबी स्थानकावरील रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला अशी मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.

मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे. परिणामी या भागात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली असून मुसळधार पावसामुळे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे. याशिवाय कामावर निघालेल्यानोकरदारांना वाटेत अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे. जोरदार झालेल्यापावसामुळे काही तासातच सायनच्या गांधी मार्केटमध्ये पाणी साचलं आहे. सायन, किंग्जसर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. सायनमध्येअनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात पहिल्याच पावसात त्रेधातिरपीट उडालेली पाहायला मिळत आहे. यात मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा कधी केलाच नव्हता, असं स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. त्यांनी आज मुंबईत आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईतील एकूण पाऊस व सद्यस्थिती जाणून घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेनं केलेले सर्व दावे पहिल्याच पावसात फोल ठरले असून मुंबई शिवसेनेनं तुंबवून दाखवली, असल्याची टीका केली. त्यावर प्रत्युत्तर देताना किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत अजिबात पाणी तुंबणार नाही, असा दावा कधीच केला नव्हता, असं म्हटलं आहे. ‘मुंबईची भौगोलिक रचना सर्वांना माहित आहे. अनेक नाले हे समुद्राच्या खाली आहेत. त्यामुळे मुंबईत अजिबात पाणी तुंबणार नाही असा दावा कधीच केला नव्हता. पण पाणी भरलं तरी ते चार ते पाच तासांपेक्षा जास्त काळ तुंबून राहणार नाही. हायटाइड गेली तर अवघ्या चार तासांमध्ये साचलेल्या पाण्याचा निचरा होईल’, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IMP