‘सारा अक्षयसोबत का रोमान्स …’ म्हणत नेटकऱ्यांनी केले अक्षय कुमारला ट्रोल

‘सारा अक्षयसोबत का रोमान्स …’ म्हणत नेटकऱ्यांनी केले अक्षय कुमारला ट्रोल

Akshay Kumar, Sara Ali Khan

मुंबई : ‘अतरंगी रे’  (‘Atrangi Re’)  या चित्रपटाचा ३ मिनिटे आठ सेकंदाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि धनुष (Dhanush) चर्चेत आहे. मात्र या चित्रपटातील अक्षय कुमारने साकारलेल्या भूमिकेबद्दल काहींनी कौतूक तर काहींनी नाराजी व्यक्त करत ट्रोल केले आहे.

‘अतरंगी रे’ चित्रपटाच्या ३ मिनिटे आठ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये सारा आणि धनुषने अनेकांची मने जिंकली आहेत. ट्रेलरच्या सुरुवातीला धनुषचे अपहरण करुन साराशी लग्न करण्यासाठी आणण्यात आल्याचे दाखवले आहे.  मात्र अक्षय कुमारची एण्ट्री होते. साराचे अक्षयवर प्रचंड प्रेम असते. चित्रपटातील काही सीन्समध्ये अक्षय आणि साराचा रोमान्स दाखवण्यात आला आहे. ते पाहून नेटकऱ्यांनी अक्षयला ट्रोल केले आहे.

या चित्रपटातील कथानकानुसार सारा अली खान आणि अक्षय या दोघांचा रोमान्स दाखविण्यात आले असून प्रेक्षकांच्या फारसा पसंतीला उतर नसल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओवर ‘अक्षय सर अॅण्ड धनुष्य अन्ना एक साथ..’, अक्षय कुमार है, तो सब सेट है…, ‘हे तर तू तुझ्या मुलीसोबत रोमान्स केल्यासारखं झालं. तू सैफसोबत (Saif Ali Khan)काम केले आहेस आणि तो तुझ्या भावासारखा आहे. थोडे काही वाटले पाहिजे’, ‘सारा अक्षयसोबत का रोमान्स करत आहे’ अशा कमेंट केले आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा दिग्दर्शक ‘अतरंगी रे’ हा आनंद एल रायसोबतचा दुसरा चित्रपट आहे. या दोघांनी यापूर्वी ‘रांझना’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे. हा चित्रपट २४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता अक्षय कुमारच्या चाहत्यांना मात्र चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता लागली आहे.

अक्षय कुमार, साराचे काही पहा फोटो.

महत्वाच्या बातम्या