नेटकऱ्यांनी सुचवलं करीनाच्या दुसऱ्या बाळाचे नाव; करीनाचे वडील म्हणाले…

करीन

मुंबई : अभिनेत्री करिना कपूर  हिच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. करिना आणि सैफ यांना पूत्ररत्नाचा लाभ झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लॉकडाऊनमध्ये करिना कपूर हिच्या प्रेग्नेसींबाबत अनेक चर्चा समोर येत होत्या. करिना कपूर हिला काल रात्री मुंबईती ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आज 21 फेब्रुवारी रोजी करिनाने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. सैफ आणि करिनाने याबाबत मीडियाला माहिती दिली आहे.

2016 मध्ये करीना पहिल्यांदा आई झाली होती. सैफ आणि करीनाने पहिल्या बाळाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या नावावरुन करीना आणि सैफ चांगलेच ट्रोलही झाले होते. आता सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे तैमूरच्या भावाचे नाव काय. सोशल मीडियावर अनेकांनी बाळाचं नाव सुचवत करीना-सैफवर निशाणा साधलाय. मात्र, आता यासर्वांमध्ये करीनाचे वडिल रणधीर कपूर यांनी बाळाचे काय नाव ठेवणार यावर मोठं भाष्य केलं आहे.

रणधीर कपूर यांना ज्यावेळी विचारण्यात आले की, करीनाच्या मुलाचे नाव काय असणार त्यावेळी रणधीर कपूर म्हणाले की, सध्या आम्ही खूप आनंदी असून आमचा आनंद सातो आसमानला पोहचला आहे. कारण मी दुसऱ्यांदा आजोबा झालो आहे. मी करीना आणि बाळाची भेट दवाखान्यात जाऊन घेतली आहे. दोघांचीही तब्येत चांगली आहे. आम्ही अजून बाळाच्या नावाबद्दल काही विचार केला नाही.

काहींनी तर ‘मुबारक हो औरंगजेब आया है’ असं म्हंटलं आहे. तैमूरचा छोटा भाऊ औरंगजेब आला अशा कमेंट करत निशाणा साधलाय. तर काहींनी महमंद घोरी, अहमद शहा अब्दाली आणि खिलजी अशी नावं सूचवत सैफ आणि करीनाला पुन्हा ट्रोल केलंय.

महत्त्वाच्या बातम्या