जातिवाचक शब्द वापरल्याने युवराज वादाच्या भोवऱ्यात, नेटकऱ्यांनी केली माफीची मागणी

yuvraj singh

नवी दिल्ली – टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर क्रिकेटपटू युवराज सिंग एका वादात अडकला आहे. एका लाईव्ह व्हिडीओमध्ये क्रिकेटपटूला उद्देशून जातिवाचक शब्द उच्चारल्याने त्याच्यावर टीका होत आहे. नेटकऱ्यांनी युवराजने माफी मागावी, अशी मागणी करत एक नवीन हॅशटॅग ट्रेंड केला आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी युवराज सिंग आणि टीम इंडियाचा फलंदाज रोहित शर्मा यांच्यात इन्स्टाग्राम लाईव्ह चॅट सुरू होता. या दरम्यान त्यांनी अनेक विषयांवर चर्चा केली. कोरोनापासून ते क्रिकेटपर्यंत अनेक विषयांवर त्यांनी गप्पा मारल्या. गप्पांच्या ओघात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोन क्रिकेटपटूंचा उल्लेख झाला. त्यावेळी युवराजने एक जातिवाचक शब्द उच्चारला.

टीम इंडियाचे खेळाडू कुलदीप यादव आणि युजवेंद्र सिंह थेट इन्स्टाग्राम चॅट दरम्यान भाष्य करीत होते. या टिप्पण्या पाहून युवराजने रोहितबरोबर मस्करीत वर्णद्वेषी शब्द वापरला. यावेळी युवराजने चहलची खिल्ली उडवताना वर्णद्वेषी शब्द वापरला.

या संभाषणात युवराज आणि रोहित चहलच्या टिकटॉक व्हिडिओची खिल्ली उडवत होते. सोशल मीडियावर युवी-रोहितचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोक त्याला ट्विटरवर माफी मागण्यास सांगत आहेत.

गोड बातमी : हार्दिक-नताशा होणार आई-बाबा

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केजरीवाल सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

प्रेक्षकांच्या आरोग्याची काळजी म्हणून ‘सूर्यवंशी’च्या निर्मात्यांनी घेतला महत्वाचा निर्णय