‘माझा होशील ना’ फेम ‘सई’च्या ग्लॅमरस फोटोंनी नेटकरी झाले चकित..!
मुंबई : छोटया पडद्यावरील बऱ्याच मालिकांनी नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यातील सगळ्यांची लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना’ या मालिकेने एका वर्षातच यशाचे शिखर गाठले. मालिकेचे कहाणी काहीशा वेगळ्या आशयावर आधारित असल्याने प्रेक्षकांनी देखील मालिकेला जबरदस्त प्रतिसाद दिला.
मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी सई आणि आदित्य ही पात्र देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती. ही पात्र गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी यांनी निभावली होती. मालिकेत सई या पात्राने लोकप्रिय झालेली गौतमी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करून तिच्या चाहत्यांना दाखवत असते. अशातच तिचे काही फोटो समोर आले आहेत गौतमीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाची जिन्स घातली आहे. तिने केसांचा हाफ बन घालून स्मोकी आय मेकअप केला आहे. फोटोमध्ये ती नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी आणि ग्लॅमरस दिसत आहे. तिने या ड्रेसमध्ये वेगवेगळ्या पोझ देत फोटोशूट केले आहे
तिचा हा फोटो नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. या फोटोवर कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. अनेकांना तिच्या या फोटोमधील स्माईल खूप आवडली आहे. त्यामुळे अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत.गौतमी ही टेलिव्हिजनवरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.तिच्या प्रत्येक पोस्टला तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देत असतात. तिने ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या आधी ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत काम केले आहे. तसेच झी मराठी पुरस्कार सोहळ्यात देखील या मालिकेला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यावरूनच या मालिकेची लोकप्रियता लक्षात येते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मेड फॉर इच अदर’ कपल म्हणत हेमंत ढोमे, क्षितीला चाहत्यांची पसंती
- ‘..याचा अर्थ लसींसाठी महाविकास आघाडी सरकारची रडारड खोटी होती’, भाजपची टीका
- पुणे जिल्ह्यातील आठवडे बाजार पुन्हा सुरू होणार ; दिवाळी पहाट कार्यक्रमांचेही आयोजन करता येणार
- ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्माला चाहत्याने केली ‘दिल’ की बात…
- १० लाख लसीकरणाचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी औरंगाबाद पालिका सव्वा लाख पावलेच दूर!