आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मोफत MPSC क्लासेस सुरू करणार :कौडगावकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि नेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमानाने आत्महत्या ग्रस्त शेतकरी यांचा मुलासाठी आणि गरजू ,होतकरू तसेच ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी MPSC चे मोफत क्लासेस  लवकरच सुरू करण्यात येणार आहेत . बऱ्याच वेळा विविध कारणांमुळे तसेच आर्थिक बाजू कमकुवत असल्यामुळे MPSC किंवा यासारख्या इतर परीक्षा देता येत नाहीत हीच गरज ओळखून मनसेच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे . मनसे चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या मार्गदर्शना खाली हे सर्व काम होणार आहे. नुकतीच मनसे नेते शैलेश कौडगावकर यांनी नेस अकॅडमी ला भेट दिली त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली . कौडगावकर यांचा यावेळी नेस अकॅडमी च्या वतीने सत्कार देखील करण्यात आला . नेस अकेडमी चे मोरे सर,पाटील सर,भोसले सर,गीते सर,सूर्यवंशी सर विनायक सर.आदी मान्यवर उपस्थित होते.