तोतयागिरी करत खंडणी उकळणाऱ्याला अटक. नेरूळ पोलिसांची कारवाई

टीम महाराष्ट्र देशा: माहिती अधिकाराचा गैरवापर तसेच पोलीस असल्याचं सांगत खंडणी उकळणाऱ्याला नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. चंद्रकांत कांबळे असं या महाभागाचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी कांबळे आणि त्याच्या पत्नीने बेकरी व्यावसायिकाला पोलीस असल्याचं सांगत जबरदस्तीने खंडनी वसूल केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल रोजी चंद्रकांत कांबळेची पत्नी सरिताने एका बेकरी दुकानात काही पदार्थ घेत खाल्ले, मात्र खालेल्या पदार्थाचे बेकरी व्यवसायिकाने पैसे मागितल्यानंतर संगीताने त्यांच्यावरच ओरडायला सुरुवात केली. काही वेळाने चंद्रकांत कांबळेने तेथे येत आपण पोलीस असल्याचे सांगितले. बेकरी चालक प्रदीप गौडा यांना धमकावत कांबळेने महिलेची छेड काढल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पाच हजार रुपये वसूल केले.

काही दिवसांनी कांबळे एका इसमाला रस्त्यावर मारत असल्याचं प्रदीप गौडा यांना दिसले. गौडा यांनी जमलेल्या गर्दीतील एका व्यक्तीला कांबळेबद्दल विचारल असता तो पोलीस नसल्याचे उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे उघड झाल्यानंतर प्रदीप गौडा यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलं केला होता.

कांबळे हा समाजात असलेल्या आपल्या ओळखीचा गैरफायदा घेत होता, एखाद्यावर पोलीस केस झाल्यानंतर तो मध्यस्थाची भूमिका बजावत, ज्याच्या विरोधात गुन्हा दाखल असेल त्याच्याकडून पैसे उकळल्यानंतर केस माघे घेतली जात. कांबळे पती – पत्नीने एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाला देखील खोटा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत १५ लाखांची खंडणी मागितल्याचे समोर आले आहे.

चंद्रकांत कांबळे सध्या तळोजा जेलमध्ये असून त्याची पत्नी जामिनावर बाहेर आहे.