नेहू सिंपल ही अच्छी लगती है.. ; नेहा कक्कड नेटकऱ्यांकडून झाली ट्रोल

neha

मुंबई : बॉलीवूड चित्रपटात एकाहून एक हिट गाण्यांच्या माध्यमाने गायिका नेह कक्कड सर्व परिचित आहे. मात्र अलिकडच्या काळात तिला ट्रोलिंगला सामोरे जावं लागत आहे. तिने सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहे. ज्यामुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे.

नेहाने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहे, ज्यात तिने हिरव्या रंगाचे शॉर्टस् आणि गुलाबी रंगाचे स्लीव्हलेस मध्ये दिसतेय. तसेच तिने ब्लॉन्ड लूक धारण केला असून नेटकऱ्यांनी तिच्यावर टिका केल्या आहेत. सोशल मीडियावर ती सतत सक्रिय असते. मात्र सर्वांची लाडकी गायिका नेहाला अशा आवतारात पाहणे काहींना पसंतीस पडले नाही.

एका चाहत्यांनी ‘ हमारी नेहू सिंपल ही अच्छी लगती हो..’ अशी कमेंट केली आहे. ‘कार्डी बीचे स्वस्त व्हर्जन, आपको सूट नही होता, अशा अनेकांनी तिच्या या वेशभूषेवर अगदी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र तिचा पती रोहनप्रीत आणि भाऊ टोनी कक्कड यांनी तिला पाठिंबा दिला असून तिच्या लूकबद्दल प्रशंसा ही केले आहे. नेहा पहिल्यांदाच ट्रोल झालेली नाही. यापूर्वी देखील इंडियन आयडलध्ये स्पर्धकाच्या प्रत्येक गोष्टींवर रडल्यामुळे ट्रोल झाली होती. काही ही असो मात्र सोशल मीडियावरील तिच्या या फोटोतील लुकवर भरपूर कमेंट, लाईक येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या