…तेव्हा नेहरुंनी मागितली होती संघाची मदत

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लष्कराविषयी केलेल्या वक्तव्याचा वाद ताजा असताना आता केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या खळबळजनक दाव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.  ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळातच जेव्हा पाकिस्तानने जम्मू-काश्मीरवर हल्ला केला होता. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडे मदत मागितली होती, असे त्यांनी म्हटले. भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पाकिस्तानविरोधात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडे मदत मागितली होती, असा दावा उमा भारती यांनी केला आहे.

Uma Bharati

नेमकं काय म्हणाल्या उमा भारती 

स्वातंत्र्यानंतर काश्मीरचे राजा महाराजा हरिसिंह संधी करारावर हस्ताक्षर करत नव्हते. शेख अब्दुल्लांनी त्यांच्यावर हस्ताक्षर करण्यासाठी दबाव टाकला. नेहरू द्विधा मनस्थितीत होते आणि पाकिस्तानने अचानक हल्ले सुरू केले. पाकचे सैन्य उधमपूरच्या दिशेने येत होते. त्यावेळी नेहरूंनी संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरूजींकडे संघाच्या स्वंयसेवकांची मदत मागितली. संघाचे स्वंयसेवक मदतीसाठी जम्मू-काश्मीरला गेले होते, असा दावा उमा भारतींनी केल्याचे वृत्त आहे .