मुख्यमंत्री फेलोशिप परिक्षेत निष्काळजीपणा

धनंजय दीक्षित : मोठा गाजावाजा करण्यात आलेल्या मुख्यमंत्री फेलोशिप उपक्रमासाठी आज ऑनलाईन परिक्षा पार पडली. मात्र या परीक्षेसाठी जी वेळ देण्यात आली होती त्यापेक्षा तब्बल दीड तास उशिराने परीक्षा सुरू झाल्याने काहीकाळ परीक्षा केंद्रावर तणाव निर्माण झाला होता.

फेलोशिप उपक्रमासाठीची परिक्षा पुण्यातील सिंहगड रोडवरील नवले आयटी झोन येथे घेण्यात आली. या परिक्षेसाठी पुणे शहरासह विविध भागातुन १ हजाराहुन अधिक विद्यार्थी आले होते. विशेष म्हणजे या परिक्षेच्या ओळखपत्रावर परिक्षेची वेळ ९.१५ मिनिटे देण्यात आली होती. विद्यार्थांना परिक्षेच्या अर्धा तास अगोदर हजर राहण्यास सांगितले होते. मात्र पर्यवेक्षकांच्या निष्काळजी आणि दिरंगाई मुळे ९.१५ सुरू होणारी परिक्षा तब्बल दिड तास अर्थात ११ वाजता सुरु झाली….. परिक्षा उशिरा सुरु झाल्याने विद्यार्थांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच परिक्षा झाल्यावरही पर्यवेक्षकांनी विद्यार्थांना अर्ध्या तासाने बाहेर सोडले.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येणारा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असला तरी पुण्यातल्या परिक्षा केंद्रावर झालेल्या या प्रकाराकडे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने बघण्याची गरज आहे.