NEET_Result : बहुप्रतिक्षित ‘नीट’चा निकाल आज लागणार!

exam result

पुणे : देशभरात कोरोनाने कहर घातल्यामुळे सर्वच क्षेत्रे कोलमडली आहेत. तर, शैक्षणिक क्षेत्राला देखील या रोगाचा मोठा फटका बसला आहे. एप्रिल-मे या परीक्षेचा हंगाम असलेल्या काळात कोरोनाचा धोका अधिक होता व त्यामुळे लॉकडाऊन देखील करण्यात आले होते. या काळात सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

नुकतंच काही दिवसांपूर्वी जेईई ऍडव्हान्सचा निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर नीटच्या निकालाची देखील उत्सुकता शिगेला गेली आहे. १३ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या नीट परीक्षांना ज्या कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना वा कंटेन्मेंट झोनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी एक संधी देण्यात आली होती.

त्या विद्यार्थ्यांची १४ ऑक्टोबर रोजी नीट परीक्षा पार पडली असून आज सर्व विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. ntaneet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यर्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. निकालासोबतच एनटीए आज नीट- 2020 परीक्षेची फायनल अंन्सर की देखील जाहीर करेल, असं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या:-