fbpx

ऑलिम्पिक विजेत्याला नमवून नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्णवेध

टीम महाराष्ट्र देशा : फ्रान्समधील सूटवेल येथे सुरु असलेल्या ॲथलेटिक्स मीटमध्ये भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत ८५.१७ मीटर भालाफेक करत त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले.

८५.१७ मी. लांब भाला फेकत नीरजने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ नीरज चोप्राचं हे दुसरं सुवर्णपदक ठरलं आहे. त्यामुळे आगामी आशियाई खेळांमध्ये नीरजकडून अशाच सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.

नीरजने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 86.47 मीटरसह सुवर्णपदक जिंकले होते आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला होता. 20 वर्षीय नीरजने 2016 मध्ये 20 वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कनिष्ठ गटातील विश्वविक्रमासह एतिहासिक सुवर्ण जिंकले होते. मात्र, रिओ ऑलिम्पिकची पात्रता निश्चित करण्यात तो अपयशी ठरला होता. फ्रान्समधील या पदकाने पुढील महिन्यात होणा-या आशियाई स्पर्धेत विक्रमी कामगिरी करण्यासाठी नीरजचे मनोबल वाढले आहे.

CwG 2018 : सिंधू – सायना आमने सामने,भारताचं सुवर्ण-रौप्य निश्चित

मिसेस इंडिया युनिव्हर्स २०१८ चा निकाल जाहीर : पुण्याच्या श्रुती शिंदेने पटकावलं उपविजेतेपद