Share

Neeraj Chopra | ‘मेरा वाला’ गाण्याच्या तालावर रणवीर सिंग सह नीरज चोपडाचे ठुमके

दिल्ली: बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंग अनेक अवॉर्ड शो मध्ये त्याच्या विविध गाण्यांवर डान्स करताना दिसतो. चाहत्यांकडून रणवीरच्या या जॉली अंदाजाला देखील भरपूर पसंती मिळते. बुधवारी दि. 12 ऑक्टोबर 2022 मध्ये दिल्लीत एका अवॉर्ड शो मध्ये अभिनेता रणवीर सिंग असाच स्टेजवर डान्स परफॉर्मन्स करताना दिसला आहे. हा डान्स परफॉर्मन्स एकट्या रणवीर सिंगने केला नसून त्याच्यासोबत ऑलम्पिक चॅम्पियन नीरज चोपडा सुद्धा यामध्ये सहभागी होता. त्यामुळे या डान्स व्हिडिओला चाहत्यांकडून अधिकच प्रतिसाद मिळत आहे. ऑलम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोपडा रणवीर सिंग यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.

CNN- News18 व्दारे हा अवॉर्ड शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नीरज चोपडा याची इंडियन ऑफ द इयर पुरस्कारांमध्ये निवड करण्यात आली.

नीरज चोपडासह रणवीर सिंगला पुरस्कार देण्यात आला आहे. रणवीर सिंगने माजी क्रिकेटपटू कपिल देव यांची भूमिका ’83’ चित्रपटात साकारली होती. 83 चित्रपटातील रणवीर सिंगची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती. CNN- News18 च्या या अवॉर्ड शो मध्ये लोकांच्या मागणीनुसार होस्टने रणवीर आणि निरज यांना डान्स करण्याची विनंती केली.

या कार्यक्रमाच्या होस्टने रणवीरला निराला डान्स शिकवण्याची विनंती केली. नीरज बरोबर डान्स करण्यासाठी सुरुवातीला रणवीर थोडासा संकोचला पण नंतर मात्र त्याने आपला अनोखा अंदाज दाखवत नीरजला डान्स स्टेप शिकवले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रणवीर आणि नीरज रणवीरच्या ‘मेरा वाला डान्स’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

2020 च्या टोकियो ऑलम्पिक मध्ये नीरज चोपडा यांनी भालाफेक मध्ये सुवर्णपदक जिंकून त्याने इतिहास रचला होता. आणि अभिनेता रणवीर सिंग हा जयेशभाई जोरदार या चित्रपटामध्ये दिसला होता.

महत्वाच्या बातम्या 

दिल्ली: बॉलिवूड मधील लोकप्रिय अभिनेता रणवीर सिंग अनेक अवॉर्ड शो मध्ये त्याच्या विविध गाण्यांवर डान्स करताना दिसतो. चाहत्यांकडून रणवीरच्या या …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now