मुंबई : नीरज चोप्राने टोकयो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावलं. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये नीरज चोप्राने ही गोल्डन कामगिरी केली. टोकयो ऑलिम्पिकमधलं हे भारताचं पहिलंच गोल्ड मेडल आहे. तसंच ऑलिम्पिक इतिहासातलं एथलिटिक्समधलं हे भारताचं पहिलंच गोल्ड मेडल ठरले आहे. त्याच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरातील लोक त्याचं कौतुक करत आहेत.
बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डाने देखील आता नीरज चोप्राची भेट घेतली आहे. नुकताच रणदीपने नीरजसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्याने हटके कॅप्शन देखील दिले आहे. विशेष म्हणजे हे दोघेही हरियाणाचे आहेत.
कसुत्ता मानस !!
नयुए धूम्मा सा ठाणदा रह 😎👊🏽👊🏽
Where does one go from the top? Very few face this question and even fewer have the answers. Upon meeting you, I deeply feel that you do brother @Neeraj_chopra1 🤗 pic.twitter.com/C4SUGbJdEb
— Randeep Hooda (@RandeepHooda) August 25, 2021
रणदीप हुड्डाने ट्विट करत लिहीले की, “कसुटा मानस. नायुये धुम्मा सा ठंडा रहा. वरून कोठे जातो? खूप कमी लोकांना या प्रश्नाला तोंड द्यावे लागते आणि फार कमी लोकांकडे याचे उत्तर असते. पण, खोलवर मला वाटते की तू भाऊ हे डिजव्ह करतो. ” असे म्हणत रणदीपचे कौतुक केले आहे.
याआधी नीरज चोप्राने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया देत सांगितले की, ‘माझ्या बायोपिकमध्ये मला हरियाणाचा रणदीप हुड्डाला पाहायला आवडेल. बॉलिवूडमधून अक्षय कुमारही मला खूप आवडतो’, असं नीरज चोप्राने यावेळी सांगितले. त्यामुळे नीरजने रणदीप भेट घेतल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद असल्याचे दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्लीत मोठ्या घडामोडी? नारायण राणेंवरील कारवाईची ‘चाणक्य’ अमित शाह यांच्याकडून दखल
- ‘चाटूगिरीमुळे बावचळलेले राऊत भोकं पडलेल्या फुग्याला एवढं का घाबरतायेत’
- रश्मी ठाकरे यांच्या विरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार
- ‘भाजपने आता तरी शहाणे व्हावे’, शिवसेनेचा सल्ला
- ‘ज्याला आपला बाप कोण हेच माहित नाही त्या लावारीस संजय राऊतला काय किंमत द्यायची’, नितेश राणेंची जहरी टीका
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<