टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक, पहिल्याच प्रयत्नात यशस्वी

मुंबई : टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेतील बुधवारचा दिवस भारतीयासाठी सकाळी एक आनंदाची बातमी घेऊन आला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेतील भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीत धडक मारली आहे. यासह नीरज चोप्राकडून पदकाची आशा वाढली आहे.

पुरुष भालाफेक स्पर्धेत ८३.५० मीटरपर्यंत भाला फेकणाऱ्या किंवा यापेक्षा कमी कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम १२ खेळाडूंना अंतिम फेरीत प्रवेश दिला जातो. बुधवारी पार पडलेल्या अ गटाच्या पात्रता फेरीत नीरजने ८६.६५ मीटरपर्यंत भाला फेकत थेट अंतिम फेरीत धडक मारली आहे. अद्यापही ब गटातील खेळाडूंची स्पर्धा बाकी आहे. मात्र नीरजने ८३.५० पेक्षा अधिक लांब भाला फेकत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.

अ गटात नीरज चोप्रा १५व्या स्थानी होता. महत्वाची बाब म्हणजे नीरजने ही कामगिरी त्याने पहिल्याच प्रयत्नात केली. नीरजसह फिनलॅण्डचा खेळाडू लेस्सी इतीलतोलो आणि जर्मनीचा वेट्टेर जोहान्सनेही अंतिम फेरीत धडक मारली आहे. जोहान्सने ८५.६४ आणि लेस्सीने ८४.५० इतक्या मीटरपर्यंत भाला फेकला आहे. येत्या ७ ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या