मदरशात मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल…

rape minor

पुणे : पुणे येथील कात्रज भागतील एका मदरशामध्ये दोन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन झाले आहे. या प्रकरणात एका मौलवीला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात भारतीय विद्यापीठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविला आहे. याच मौलवीवर मदरशातील आणखीन २५ ते ३० मुलांवर लैंगिक छळ केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी मौलवीच नाव मौलाना रहीम असे आहे.

दि.२७ ला शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी मौलानाला अटक केली. या प्रकरणात बाल अधिकार कार्यकर्त्या डॉ. यामिनी आदबे यांनी पोलिसांकडे तक्राराची नोंद केली. अटक करण्यात आलेल्या २१ वर्षीय आरोपी मौलवी हा बिहारचा असल्याचे समजते. तसेच मदरशातील आणखीन ३६ मुलांची सुटका पोलिसांकडून करण्यात आली.

या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदबे यांना दहा वर्षांची दोन मुले पुणे रेल्वे स्थानकावर संशयास्पद फिरताना आढळली. त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या शोषणाचा गोप्यास्फोट केला. रात्र-अपरात्री आरोपी मौलवी हा मदरशातील लहान मुलांवर अत्याचार करत होता. या आरोपी मौलवीच्या तावडीतून निसटून आम्ही येथे आलो असल्याची माहिती या मुलांनी आदबे यांना सांगितली. या माहितीनुसार आदबे यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात जाऊन गुन्हा दाखल केला.

या घटनेबद्दल शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पुणे भारती विद्यापीठ पोलीस वरिष्ठ निरीक्षक विषु पवार यांच्याशी संवाद साधला. यावेळी आ.डॉ.गोऱ्हे यांनी मुलांचे समुपदेशन करणे आवश्यक असल्याने स्त्री आधार संस्थेतील पदाधिकाऱ्यांना सूचना देऊन समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे या मौलवींनी आणखी किती मुलांवर अत्याचार केले आहेत, तसेच यापूर्वी देखील अशा काही घटना घडल्या आहेत का? या मदारशात किती मुले होते याचे रेकॉर्ड पासून काही मुले बेपत्ता आहेत का? या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आ.डॉ.गोऱ्हे यांनी केली.