Share

Neelam Gorhe | “रामदेव बाबांचं वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारं”; नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला संताप 

Neelam Gorhe | मुंबई : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात रान पेटलेलं असताना योगगुरु बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. योगगुरु रामदेव बाबा (Ramdev Baba) यांनी आता महिलांच्या कपड्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ठाण्यातील एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी हे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

त्या म्हणाल्या, “प्रत्येकच पुरुष अशा प्रकारे महिलांकडे पाहत नसतो. आपल्या घरात असलेले पुरुष, भाऊ, मित्र, सहकारी अशा अनेक पुरुषांबरोबर स्त्रीचा दैनंदिन जीवनात संपर्क येत असतो.” आपल्या देशात स्वतःला गुरू म्हणवणाऱ्या अशा अनेक पुरुषांची जीभ घसरणे लाजिरवाणे आहे. यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांच्या पत्नी आणि इतर स्त्रिया तिथे उपस्थित होत्या. याबाबत त्यांनी निषेध करायला हवा होता”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

“रामदेव बाबांचे वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारे आहे”, असं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. “योगाच्या माध्यमातून संयम, स्वाथ्य, अशा गोष्टी समाजाला सांगत असताना स्वतः मात्र महिलांबाबत असा दूषित दृष्टिकोन ठेवणं अत्यंत चुकीचं आहे”, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनीही संताप व्यक्त केलाय. त्या म्हणाल्या, महिलांनी काय घालायचं काय नाही हा तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. हे विधान अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या समोर झालं आहे. अमृताताईंनी त्यांच्या सणकन कानाखाली ओढायला हवी होती, अशी संतप्त प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे यांनी दिली आहे.

काय म्हणाले होते रामदेव बाबा?

ठाण्यामध्ये महिलांसाठी योग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. योगा कार्यक्रमात महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते आणि त्यानंतर महिलांसाठी महासंमेलानाचे आयोजन करण्यात आले होते. या महासंमेलनासाठी महिलांनी साड्या आणल्या होत्या. मात्र दोन्ही कार्यक्रम सलग असल्याने महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. याबाबत बाबा रामदेव यांनी म्हटलं की साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही अडचण नाही. आता घरी जाऊन साड्या नेसा. पुढे रामदेव बाबा म्हणाले की, “महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने तर काही नाही घातलं तरी त्या चांगल्या दिसतात.”

महत्वाच्या बातम्या :

Neelam Gorhe | मुंबई : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यात रान पेटलेलं असताना योगगुरु बाबा रामदेव यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics