‘आव्हाडांची केंद्रीय गृहमंत्र्यांकडून चौकशी करा’ , निलम गोऱ्हे यांची सरकारकडे मागणी

पुणे : मनोहर पर्रिकर यांच्याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच भोवणार असंच दिसतंय. कारण जितेंद्र आव्हाड यांची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी सरकारकडे केली आहे. याप्रकरणी आव्हाड यांनी कोणत्या आधारावर टीका केली त्याचे कोर्टाकडे पुरावे सादर करावेत, मनोहर पर्रिकर म्हणजे राफेलचा पहिला बळी आहेत अशी आव्हाडांनी टीका केली होती.

दरम्यान, “मी 4 ते 5 वेळा त्यांना भेटलो होते. अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. पण, माझं असं वैयक्तिक मत आहे की, राफेलची बोलणी सुरू असताना अस्वस्थ असलेल्या पर्रीकरांनी दिल्लीचं राजकारण आपल्याला जमणार नाही, हे ओळखून गोव्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले, ते परत कधी दिल्लीला गेलेच नाही. त्यांच्या मनातल्या वेदना त्यांनी अनेक मित्रांसोबत बोलून दाखवल्या होत्या. आता, मरणानंतर कोणावरती बोलू नये, पण माझ्या अंदाजाने हा राफेलचा पहिला बळी गेला”, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. आणि आता हे आव्हाडांच वक्तव्य त्यांना चांगलाच भोवणार असल्याच दिसत आहे.