ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी पेट्रोल-डिझेल वितरण सुरु ठेवा

पुणे : ‘शेतकऱ्यांना भर उन्हात रात्री-अपरात्री पिकाला पाणी देण्यासाठी जावं लागतं. भाजीपाला, धान्य, चाऱ्याची वाहतूक, नांगरट व ट्रॅक्टरवरील मळणी यासाठीही डिझेल लागतं. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल वितरण सुरु ठेवावं, अशी विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडं केली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने जमावबंदी, संचारबंदीबरोबरच जीवनावश्यक वस्तू वगळून सर्वच गोष्टींच्या विक्रींना बंदी घातली आहे. त्यानंतरही रस्त्यावर वाहने दिसत असल्यानं सरकारनं पेट्रोल-डिझेल विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत असल्याने या निर्णयासंदर्भात पुर्नविचार करण्याची विनंती आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडं केली आहे.

Loading...

तसेच, गावाकडे निघालेल्या कामगारांना घरी परतण्यासाठी पोलिसांनी मदत करावी, त्याचबरोबर ‘चालू साखर कारखान्यांनी आपल्या ऊसतोड कामगारांची आहे. तिथेच काळजी घ्यावी. तर याबाबत मी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही बोललो असून त्यांचंही याकडं बारकाईनं लक्ष आहे,’ अशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

दरम्यान राज्यात लॉकडाऊन असलं तरी अत्यावश्यक सेवांची दुकान चालू राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी एकाच दिवशी गर्दी करू नये. अन्नधान्याच्या पुरवठ्याबाबत राज्य हे कटीबद्ध आहे. त्यामुळे कोणीही चिंता करू नये. तसेच शेतीविषयक कामांमध्ये वाहतुकीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका