ग्रामीण भागातील मराठी शाळा वाचवणे गरजेचे

लक्ष्मण साबळे, पुणे : लहानपणीच्या कित्येक आठवणी आणि गमती जमती मराठी शाळेत घडतात. अनेक हुशार विद्यार्थी घडून मोठे अधिकारी साहेब झाले आहेत. मात्र आता इंग्लीश स्कूलचा बाजार तेजीत असताना मराठी शाळा इतिहासजमा होत आहेत. शासन स्तरावर प्रयत्न होतं असतानाही मराठी लोकांच्या इंग्रजीच्या अति आकर्षणामुळे मराठी शाळा इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत.

कुठे थांबणार आहे हा ऱ्हास मराठी शाळेचा…

Loading...

लहानपणी मी ही प्राथमिकशाळेचं शिक्षण घेतले. त्यावेळेची शिक्षण पद्धती आजची शिक्षणपद्धती सारखीच आहें. त्यात कित्येक सुधारणा झाल्या आल्या तरी विद्यार्थी संख्येत मात्र कमालीची घट झाली आहे. काही शाळा दप्तरासाठी चालवायची वेळ येतं आहे.

अचानकच इंग्लीश मीडियमचा जोर वाढला. एलकेजी टू हायस्कूल, इंग्लीश मीडियम शिक्षण डोनेशनवर चालू झाले. घरोघरीं नेण्यासाठी पिवळ्या बसेस आल्या. आई बाप दहा बारा हजार रूपय भरायला तयार होतात. एकवेळ 5 रुपयासाठी घरी तासभर रडावं लागायच. आज पिवळ्या बसमध्ये चढून पोरगं बाय बाय करतं तेवढच बघून बापाला समाधान वाटतं. तिथं शिकवलं जात पण मराठी शाळेतील अनुभवी शिक्षक क्वचितच तिथं मिळतात.

इंग्लीशला आपला विरोध नाही पण मराठी शाळा टिकवून त्यांचा दर्जा वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठी व गावच्या शाळेत लक्ष दिलं जात नाही. म्हणून दुसऱ्या चांगल्या ठिकाणी शाळेत घालू असे म्हणणारे पालक वाढले आहेत. गावचे वैभव शाळा आहेत त्या टिकणे गरजेचे आहे. 100/ 125 विद्यार्थी असलेल्या शाळा आज 30/40 वर येतं आहेत. गावच्या अंगणवाडीत महिला भगिनी व मोजके बालक जातात. तिथली बालक नर्सरी स्कूलमध्ये घातली जातात.

मराठी ही आपली संस्कृती आहे. मराठी शिवाय गोडीच नाही. म्हणुन मराठी शाळा वाचवनें गरजेचे वाटते..इंग्लीश हा विषय पहिली पासूनच आहे. तो मागे रहायचा विषयच उरत नाही. सर्वानी नक्कीच विचार करा. आपले बालक मराठी शाळेत घालूया आणि मराठी शाळा वाचवूया.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
एकनाथ खड्सेंचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास ; फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?
'तृप्ती देसाईंवर अश्लील टीका इंदुरीकरांच्या सूचनेनुसारच' ; तासगावात तक्रार
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
ही सदिच्छा भेट आहे. बाकी तपशिलात खोल शिरण्याची गरज नाही - खा. संजय राऊत