एकनाथ खडसेंची महाराष्ट्राला गरज- गिरीश महाजन

जळगाव: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे साहेबांना राज्यसभेत जाऊ देणार नाही त्यांची महाराष्ट्राला गरज आहे, असे विधान केले आहे. भुसावळ शहरातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र येथे ६६० मेगावॅट क्षमतेचा नवीन औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यात येणार आहे. १३ प्रकल्पांचं उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान गिरीश महाजन बोलत होते.

bagdure

या कार्यक्रमात माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या राजकीय टोलेबाजी पाहायला मिळाली. कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जा ,नवीन आणि पारंपरिक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री एकनाथराव खडसेंसह जिल्ह्यातील आमदार-खासदार उपस्थित होते.

दरम्यान, एकनाथ खडसेंसोबत एका मंचावर नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी दौरा टाळल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली होती. संपूर्ण भारतातील आधुनिक ऊर्जा निर्मितीचे केंद्र हे भुसावळ थर्मल पावर स्टेशन आहे. याठिकाणी ५०० मेगावॅटचे दोन आणि २०० मेगावॅटचा प्रकल्प आहे. आणि आता ६६० मेगावॅटचा एक नवीन प्रकल्प सुरु करण्यात येत आहे.

You might also like
Comments
Loading...