‘महापुराच्या संकटाला रोखण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला नदीजोड प्रकल्प राबविण्याची गरज’

बाबासाहेब

मुंबई   – सातारा,सांगली आणि कोल्हापूर तसेच कोकणात चिपळूण आणि महाड मध्ये अतिवृष्टीने पूरस्थिती निर्माण झाली. त्यात मोठी मनुष्यहानी आणि वित्तहानी झाली आहे. दरड कोसळून अनेक गावांत मोठी हानी झाली आहे. केंद्र सरकार राज्यातील संकटग्रस्त नागरिकांच्या पाठीशी उभी आहे. दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदतीची गरज आहे. बॉलिवूड मधील कलाकार आणि कॉर्पोरेट उद्योग जगतातील मोठया उद्योगपतींनी दरडग्रस्त आणि पूरग्रस्तांना मदतीचा हात द्यावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

महापुराच्या नैसर्गीक संकटाला रोखण्यासाठी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला नदीजोड प्रकल्प राबविण्याची देशात गरज आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकार नदीजोड प्रकल्प राबविण्यास अनुकूल आहे असे रामदास आठवले यांनी सांगितले.रायगड महाड आणि सातारा जिल्ह्यातील वाई ;पाटण या दरडग्रस्त गावांचा दौरा करून आल्यानंतर मुंबईत पत्रकारांना आठवलेंनी माहिती दिली. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील आणि पाटण तालुक्यातील दरड कोसळून दुर्घटना झालेल्या गावांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली.

वाई तालुक्यातील कोंडवळे या गावात दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांची रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली यावेळी रिपाइं चे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक गायकवाड,अण्णा वायदंडे,परशुराम वाडेकर,विजयसिंह ढमाले , उमेश कांबळे, बापू गायकवाड, विशाल शेलार आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.वाई नंतर पाटण मधील दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेल्या ढोकावळे आणि आंबेघर, कोयनानगर या दुर्गम भागातील गावांना आठवले यांनी भेट दिली.

दरड कोसळून झालेल्या दुर्घटना आणि सांगली कोल्हापूर तसेच कोकण मधील पुराने झालेल्या हानी ची आपण पाहणी केली असून याबाबत केंद्र सरकार कडून मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. बॉलिवूडमधील कलाकार,कॉर्पोरेट व्यापारी वर्ग यांनी दरडग्रस्त आणि पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी अभ्यास समिती नेमून धोकादायक डोंगराचा सर्व्हे करून डोंगरावरील गावांचे सुरक्षितस्थळी पुनर्वसन करावे अशी मागणी  रामदास आठवले यांनी केली आहे. दरड कोसळून उध्वस्त झालेल्या लोकांना कायमस्वरूपी घरे देऊन पुनर्वसन करण्यास वर्षभराचा कालावधी जाईलतोपर्यंत तात्पुरता निवारा उभा करून त्यांचे पुनर्वसन करावे अशी सूचना रामदास आठवले यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या