‘आज पुन्हा एकत्र येण्याची गरज़…’ ; खास लुक शेअर करत सोनालीने केले आवाहन

सोनाली

मुंबई : महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

मात्र, सध्या कोरोनामुळे सर्व नागरिक घरी राहूनच महाराष्ट्र दिन साजरा करत आहेत. अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यादिवशी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील महाराष्ट्र दिनाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनाली कुलकर्णीने तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत लिहिले, ‘राष्ट्रनिर्मितीसाठी ते झटले, आपण राष्ट्र टिकवण्यासाठी झटूया…हुतात्मे ते झाले, आपण मराठी माणसाला वाचवूया…आज पुन्हा गरज़ आहे एकत्र येण्याची, एकमेकांसाठी, या महाराष्ट्रासाठी, एकजुट होऊया…जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया.’

महत्त्वाच्या बातम्या