निलेश राणेंचे डोके तपासण्याची गरज – दीपक केसरकर

टीम महाराष्ट्र देशा : माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघेंच्या हत्येचा कट रचल्याचे आणि त्यांचा मृत्यू रुग्णालयात झाल्याचे भासवण्यात आला असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यावरून शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्यांनी निलेश राणेंना चांगलेच झापले आहे.

यावेळी बोलताना दीपक केसरकर म्हणाले, “बाळासाहेबांवर आरोप करणाऱ्यांची डोकी तपासावी लागतील. बाळासाहेबांवर बोलण्याची यांची लायकी आहे का ? कोणीही उठावं आणि बाळासाहेबांवर टीका करावी हे सहन करणार नाही, अशा शब्दात त्यांनी नितेश राणेंना इशारा दिला आहे.

Loading...

पुढे बोलताना केसरकर म्हणाले, निलेश राणेंच्या बोलण्याला कोणीही गांभीर्याने घेणार नाही. असं वक्तव्य करुन सनसनाटी निर्माण करायची आणि यातून आपल्याला काहीतरी मोठेपणा मिळेल हा त्यांचा उद्देश आहे. अशा माणसांना महाराष्ट्रातील जनता आपटेल, अशा जोरदार शब्दात राणेंवर हल्ला चढवला आहे.

माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची हत्या करण्यात आली असून त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले असल्याचे निलेश राणे म्हणाले आहेत.त्यानंतर कर्जतच्या फार्म हाऊसवर बाळासाहेबांच्या सांगण्यावरूनच दोन शिवसेना नेत्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला व त्यानंतर त्यांच्या हत्या झाल्याही अशा शब्दात थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत.

आनंद दिघे यांच्या पुतण्याची प्रतिक्रिया

“दर पाच वर्षांनी निवडणुकीत आनंद दिघे यांच्या मृत्यूचा विषय उकरुन काढला जातो आणि निवडणुकीनंतर विषय संपुष्टात येतो. नीलेश राणे यांनी हे गंभीर आरोप का केले हे मलाही माहित नाही, पण जर त्यांच्याकडे यासंदर्भातील काही पुरावे असतील तर ते जनतेसमोर आणावेत. आनंद दिघे यांच्याविषयी अनेकांच्या मनात आदराचे स्थान आहे.या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कोणीही भावनांचा उद्रेक करु नये, तसेच आनंद दिघे हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असल्याने त्यांच्याविषयी विधान करताना प्रत्येकाने जबाबदारीचे भान ठेवावे, असंही केदार दिघे यावेळी म्हणाले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
उदयनराजे भोसले यांची निर्दोष मुक्तता
कळत नाही राव ! अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत का मुख्यमंत्री : चंद्रकांत पाटील