पाकिस्तानसोबत एकदा आरपार लढाई झालीच पाहिजे – रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा : ‘मला वाटतं पाकिस्तानसोबत एकदा आरपार लढाई झाली पाहिजे. आम्ही मैत्री करण्यास इच्छुक आहोत. पण एकदा पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे’ अस परखड मत आरपीआय अध्यक्ष रामदास आठवले व्यक्त केल आहे.

bagdure

पाकिस्तानी लष्कराने राजौरी व पूंछ जिल्ह्यात केलेल्या गोळीबारात चार जवानांना वीरमरण आल्याच्या वृत्ताने देशभर संतापाची लाट उसळली असून, पाकला आता जोरदार अद्दल घडवा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे. पाकिस्तान सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत असताना भारताने गप्प न बसता, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेकी व पाक सैनिक यांचे अड्डे व बंकर्स संपवून टाकावेत, अशी चर्चा सामान्यांमध्येही सुरू होती. सोमवारी बीएसएफचा एक अधिकारीही पाकच्या हल्ल्यात जखमी झाला.

You might also like
Comments
Loading...