Google- डाटा बचतीसाठी गुगलचे अ‍ॅप

गुगलने डाटा बचत करण्यासाठी खास ट्रँगल हे अ‍ॅप विकसित केले असून याच्या माध्यमातून युजरला त्याच्या डाटा वापरावर नियंत्रणाची सुविधा देण्यात येणार आहे.

अनेक अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये अद्यापही इंटरनेटची गती संथ असून डाटा कमी प्रमाणात वापरला जातो. या देशांमधील कोट्यवधी युजर्ससाठी डाटा व्यवस्थापन हा सर्वात कळीचा मुद्दा आहे. नेमकी हीच समस्या लक्षात घेत गुगलने ट्रँगल हे खास अ‍ॅप सादर केले आहे. याच्या मदतीने अतिशय सुलभ पध्दतीने डाटा मॅसेजमेंट शक्य आहे. यात संबंधीत युजरकडे शिल्लक असणाण्या डाटाचे वारंवार विश्‍लेषण करण्यात येते. याचा आढावा घेतच या स्मार्टफोनमधील अ‍ॅप्स सुरू होत असतात. यात कुणीही युजर एखादे अ‍ॅप नेमके किती वेळ सुरू राहील? याची सेटींगदेखील करू शकतो.