औरंगाबादेत ‘नीट’ची परीक्षा व्यवस्थित पार पडली!

neet

औरंगाबाद : शहरातील केंद्रांवर नीट परीक्षा उत्साहात पार पडली. या परीक्षेची नियमावली पाळतांना मात्र विद्यार्थ्यांची मोठी परिक्षा पार पडली. परीक्षेला हाय हील्सच्या सँडल, बूट यास परवानगी नसल्याने विद्यार्थ्यांनी पेपरला अनवाणी जाणे पसंत केले. कमरेचा बेल्ट, हातामध्ये घालण्यात आलेला दोरा सुद्धा विद्यार्थ्यांना काढण्यास सांगितले आले. १५ हजार ४५० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.

वैद्यकीय व दंत महाविद्यालयातील प्रवेशासाठी देश पातळीवरील सामाईक प्रवेश परीक्षा अर्थात नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट म्हणजे ‘नीट’ परीक्षा रविवारी (दि. १२) शहरात उत्साहात झाली. सकाळी ११ पासूनच केंद्राच्या आवारात गर्दी होण्यास सुरूवात झाली होती. केंद्राच्या बाहेर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था व परीक्षेची नियमावली, यांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी केवळ प्रवेशपत्र व छायाचित्र असणारे ओळखपत्र ठेवण्यास परवानगी देण्यात आली. ‘नीट’साठी ड्रेसकोड ठरवून देण्यात आला होता.

तसेच परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांनी बूट घालून न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही जे विद्यार्थी बूट घालून परीक्षेला आले त्यांना ते पेपरला जाताना प्रवेशद्वारावरच काढून ठेवण्यास सांगण्यात आले. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकसुद्धा आले होते. विद्यार्थी परीक्षेला गेल्यानंतर पालकांनी केंद्राच्या जवळपास पेपर सुटेपर्यंत थांबणे पसंत केले. शहरातील ४३ केंद्रांवर नीट परीक्षा दुपारी दोन ते पाच दरम्यान पार पडली. १५ हजार ८५० विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्यासाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ हजार ४५० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. उपस्थितीचे प्रमाण ९७.०५ टक्के होते.

महत्त्वाच्या बातम्या