शेजाऱ्याने केले पती पत्‍नीच्‍या शारी‍रिक संबंधाचे चित्रीकरण; पोलिसांत गुन्हा दाखल 

पुणे: पुण्‍यातील हिंजवडी येथे पती-पत्‍नीच्‍या शारी‍रिक संबंधाचे चित्रीकरण करुन त्‍याआधारे महिलेचा विनयभंग करण्‍याचा धक्‍कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिस स्‍टेशनमध्‍ये गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. कुंदन आष्‍टे असे आरोपीचे नाव असून तो फरार झाला आहे.पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपी कुंदन अष्‍टे हा महिलेच्‍या वरच्‍या फ्लॅटमध्‍ये राहतो. मागील 3 महिन्‍यांपासून महिला आणि तिच्‍या पतीमधील शारीरिक संबंधाचे चित्रीकरण त्‍यांच्‍या नकळत सेल्‍फी स्टिकने तो करत होता.
हे व्हिडिओ त्‍याने आपल्‍या लॅपटॉपमध्‍येही सेव्‍ह केले होते. हे व्हिडिओ महिलेला दाखवून तिच्‍याशी अश्‍लील वर्तन करण्‍याचा प्रयत्‍न आरोपीने केला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस स्‍टेशनमध्‍ये महिलेने तक्रार दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहे

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...