मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपलं, एनडीआरएफच्या पथकांकडून बचावकार्याला सुरुवात

ndrf

चिपळूण : महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. कोल्हापूर, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यातील अनेक नद्या धोक्याच्या पातळी वरून वाहत आहेत. गावातील अनेक सखल भागात घरांमध्ये तसच बाजारपेठेत पाणी शिरलं असून, नदी पात्रा जवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

चिपळूमधील वशिष्टी नदीच्या पाणी पात्रात वाढ होऊन सध्या धोकापातळीवर वाहते. पुराचे पाणी बाजारपेठेत शिरल्याने व्यवसायिकांची धावपळ उडालेली आहे. चिपळूण, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आणि रायगड जिल्ह्यातील महाड मध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्यानं राष्ट्रीय आपत्ती दलाच पथक चीपळून मध्ये दाखल झाले आहे.

राज्यात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापूर आणि रत्नागिरीत पावसामुळे धोका निर्माण झाला असून एनडीआरएफची पथकं दाखल झाली आहे.

कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची भीती आहे तर दुसरीकडे चिपळूणमध्ये २००५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे. चिपळूणमध्ये घरं, बाजारपेठेत पाणी शिरलं असून दोन बोटींच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुुर करण्यात आलं आहे. याशिवाय रायगड, ठाणे येथेही पावसाने धुमाकूळ घातला आहे.

गेली दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदी धोक्याची पातळीवर पोहोचली आहे. जगबुडी नदीच्या पुराचे पाणी खेडच्या बाजारपेठेत शिरले आहे. बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यवसायिकांची आपल्या दुकानातील माल हलविण्यास धावपळ उडाली आहे. नगरपरिषदेकडून नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय.

महत्त्वाच्या बातम्या

IMP