मुस्लिमांना आमच्या संस्कृतीत मिळून राहावे लागेल;ज्यांना पटत नसेल त्यांनी देशाबाहेर जावे-भाजप आमदार

टीम महाराष्ट्र देशा: भाजप मधील वाचाळवीरांचे वक्तव्य काही थांबण्याचे नाव घेत नाही. आता उत्तरप्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील बैरियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी आता २०२४ पर्यंत भारत हे हिंदुराष्ट्र होणार असल्याच अजब वक्तव्य केल आहे.

आमदार सुरेंद्र सिंह पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “देशात काही मुस्लिम हे देशभक्त आहेत पण जेव्हा भारत हिंदू राष्ट्र होईल तेव्हा मुस्लिमांना आमच्या संस्कृतीत मिळून मिसळून राहावे लागेल तरच ते देशात राहू शकतील, ज्यांना हे पटत नसेल त्यांनी देशाबाहेर जावे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे अवतार पुरूष आहेत. २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होत असून २०२४ मध्ये भारत हिंदू राष्ट्र होईल. मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्याचवेळी भारत हा महाशक्ती झालेला असेल त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही वाटा असणार आहे.”

या नंतर सुरेंद्र सिंह यांनी आपल्या वाक्याचा विपर्यास केला असल्याच सांगून आता घुमजाव केल आहे. मात्र, भाजप आपल्या या वाचाळवीरांचा कसा बंदोबस्त करणार हे पाहण्यासारख असणार आहे.