भारताकडून साखर घेण्यास चीनने दर्शवली अनुकूलता, 20 लाख टन साखरेची होणार निर्यात

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय साखरेसाठी चीनची बाजारपेठ खुली होण्याच्या दृष्टीनं दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू असून प्रामुख्यानं महाराष्ट्रातील साखर उद्योगाला त्याचा फायदा होणार आहे. भारताकडून साखर घेण्यास चीनने अनुकूलता दर्शवली असून यंदा किमान 20 लाख टन साखरेची चीनला निर्यात होऊ शकेल अशी अपेक्षा राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

चीनच्या साखर उद्योगाचं शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर असून उद्या ते उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांना तर बुधवारी महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना भेट देणार आहे, असंही पाटील यांनी सांगितलं.