अंधेरी पूल दुर्घटनेमुळे मुंबईकरांना आज घडणार उपवास; डबेवाले अडकले स्टेशनवरच

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील अंधेरी स्टेशनजवळ पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यानं पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे चर्चगेटहून विरारकडे जाणारी व विरारहून चर्चगेटच्या दिशेनं येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 आणि 9 वरील ही घटना आहे. आज सकाळी 7.35 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामध्ये २ जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, ऐन गर्दीच्या वेळेस वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे सकाळी-सकाळीच रेल्वे वाहतूक कोलमडल्यामुळे हैराण झालेल्या चाकरमान्यांना या घटनेमुळे आता उपाशी राहण्याची वेळ आलीये.

कारण मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेला मुंबईचे डबेवाले अंधेरी ते विरारदरम्यान अडकून पडले आहेत. अंधेरी पूल दुर्घटनमुळे डबेवाल्यांची सेवा खंडीत झाली आहे. यामुळे डबेवाल्यांची सेवा बंद ठेवण्यात आल्यानं मुंबईकरांना आज उपवास घडणार आहे.

पादचारी पुलाचा भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यानं मुंबईत रेल्वे वाहतूक ठप्प

पादचारी पुलाचा भाग रेल्वे ट्रॅकवर कोसळल्यानं मुंबईत रेल्वे वाहतूक ठप्प