fbpx

लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ला पूर्ण बहुमत मिळेल : रामदेव बाबा

टीम महाराष्ट्र देशा : देशातील लोकसभा निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. आता सगळ्यांना निकालाचे वेध लागले आहेत. असताच योगगुरू रामदेव बाबा यांनी २३ मे ला ‘एनडीए’ला ला पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

रामदेव बाबा यांनी हरिद्वार येथील कार्यक्रमात बोलताना ‘एनडीए’चं सरकार बनेल असा विश्वास व्यक्त केला, तसेच नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असं देखील रामदेव बाबांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी विरोधीपक्षांवर देखील जोरदार हल्लाबोल केला. माझ्या भविष्यवाणीनं २३ मे रोजी देशातील काही राजकारण्यांचं स्वास्थ बिगडेल. त्यांना टेन्शन येईल. शिवाय, त्यांचं मानसिक स्वास्थ बिघडेल असं रामदेव बाबा पुढे बोलताना म्हणाले.

दरम्यान, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत रामदेव बाबांनी भाजपचा प्रचार केला होता. परंतु यावेळी बाबा प्रचारापासून लांब आहेत.