पुण्यात एनडीएच्या विद्यार्थ्याची आत्महत्या  

NDA student suicides in Pune

पुणे :-  खडकवासला येथील एनडीएमध्ये नेव्हीचे प्रशिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आलेख जैसवाल अस त्या विद्यार्थ्याच नाव असून तो मूळचा छतीसगडचा रहिवाशी होता. या आत्महत्येमागील कारण समजू शकले नसून याचा तपास उत्तमनगर पोलिस स्टेशन करत आहेत.

 

खडकवासला येथील एनडीएमध्ये आलेख जैसवाल हा मागील अडीच वर्षापासून प्रशिक्षण घेत होता. आलेखने आज त्याच्या रूममध्ये सायंकाळी 5 वाजून 15 मिनिटाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही बाब शेजारी राहणाऱ्या मित्राने तेथील अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर तातडीने मिलिटरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासले असता मृत घोषित केले. या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.