सैन्य प्रशिक्षण घेतल्याशिवाय पदवी देऊ नये – नाना पाटेकर

पुणे : पदवीधर झाल्यानंतर सैन्यात एक वर्ष घालवणे सक्तीचे केले पाहिजे. त्याशिवाय पदवी देऊ नये, असे मत माझे यापूर्वीही होते आणि आताही तेच आहे, अशी स्पष्टोक्ती नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. पुण्यातील एनडीएच्या दिक्षांत समारंभ सोहळ्यात ते बोलत होते.

bagdure

ते पुढे म्हणाले की, सध्या आपल्या शहरामध्ये असलेले वातावरण निराशाजनक आहे. देश भावना न ठेवता परस्परांमध्ये वाद निर्माण केले जातात. मात्र, एनडीएच्या कॅडेट्सना पाहिल्यावर समाधान वाटते. आपले भविष्य सुरक्षित आहे याची खात्री झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पद्मावती प्रदर्शित होऊ द्या, मग त्यावर बोला सध्या देशभरात गाजत असलेल्या पद्मावती चित्रपटाच्या वादावरही त्यांनी भाष्य केले. पद्मावती चित्रपट प्रदर्शित होऊ द्या मग त्यावर बोला. नाक कापण्याची, जिवे मारण्याची भाषा करणे योग्य नाही. परंतू असे असले तरी यांच्याच चित्रपटाबाबत वाद का निर्माण होतात. माझ्या चित्रपटाबाबत कधी वाद निर्माण झाला नाही, असे सांगत त्यांनी संजय लीला भन्साळी यांच्यावरही निशाना साधला.

You might also like
Comments
Loading...