आता मिशन शिरूरकडे नेत्यांचा मोर्चा; युतीचे बडे नेते आढळरावांच्या प्रचारासाठी घेणार सभा

thackeray gadkari fadanvis

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील मतदान आज पार पडत आहे, राज्यातील १४ मतदारसंघासाठी मतदान केले जात आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच मतदारसंघाचा समावेश आहे. तिसऱ्या टप्यातील मतदान पार पडल्यानंतर युती – आघाडीच्या बड्या नेत्यांचा मोर्चा शिरूर, मावळ लोकसभेकडे वळणार आहे.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे चौथ्यांदा लोकसभेत जाण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. तर यंदा राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांनी त्यांच्यापुढे आव्हान उभे केले आहे. राज्यातील शेवटच्या टप्यात या मतदारसंघात मतदान होणार असल्याने उमेदवार आणि स्थानिक नेत्यांनी आजवर सभा घेतल्या. आता युती – आघाडीचे प्रमुख नेते मतदारसंघात सभा घेणार आहेत,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिक्रापूर येथे, तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उरुळी कांचन आणि हडपसर येथे सभा घेणार आहेत. २४ एप्रिल रोजी आळंदी आणि हडपसरमध्ये ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री विजय शिवतारे आदी नेते देखील शिरूर मतदारसंघात प्रचार सभा घेणार आहेत