‘भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु’ ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन

blank

टीम महाराष्ट्र देशा :  राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार ११ नाही तर १५ दिवसात पडेल, असं केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवलेंनी सांगितलंं. या आघाडीत वैचारिक वाद आहेत त्यामुळे हे सरकार फार दिवस चालेल असं आम्हाला वाटत नाही, असंही आठवले म्हणाले.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे भाजप-शिवसेनेनं एकत्र यावं. आपण मिळून सरकार स्थापन करु, असं आवाहन केंद्रीय सामाजक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. मिरज येथील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी वक्तव्य केलं आहे. यावेळी ठाकरे सरकारवर जोरदार टीकाही केली.

एनआरसीमुळे कोणाचंही नागरिकत्व धोक्यात येणार नाही. पण काँग्रेस आणि विरोधी पक्ष मुस्लिम समाजात गैरसमज निर्माण करत आहे, असा आरोप आठवलेंनी केला आहे.

राज्यात ठाकरे सरकार आल्यामुळे महिलांवर आत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफीची घोषणाही फसवी निघाली, असा आरोप आठवलेंनी केला आहे.

हेही पहा –