एनडीए आता केवळ कगदावरच; पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्यवेळी योग्य निर्णय घेतील: राऊत

sanjay-raut

मुंबई : मोदी सरकारचा महत्वपूर्ण मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला आहे. या विस्तारत मित्रपक्ष शिवसेनेला एक मंत्रीपद दिल जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, मंत्रीपद तर सोडाच पण शपतविधी कार्यक्रमाला देखील शिवसेना नेत्यांना बोलवण्यात आल नसल्याच बोलल जात आहे. या पाश्वभूमीवर आता शिवसेना नेत्यांकडून अपेक्षेप्रमाणे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) एकाही घटकपक्षाला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे भाजपला फक्त विधेयक मंजूर करताना आणि निवडणुका आल्यावरच, ‘एनडीए’ची आठवण होते, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

पुढे संजय राउत म्हणाले, शिवसेनेला सत्तेचा मोह नाही. लोकशाहीत बहुमत पाशवी आणि सैतानी असते. सत्ता ही आळवावरचे पाणी आहे. शिवसेनाप्रमुखांनी हे आम्हाला शिकवले आहे. त्यामुळे निराश व्हायचे नाही नाराज व्हायचे नाही, लोकशाहीत कोणी फार छाती पुढे काढू नये. जनता कधी टाचणी लावेल आणि हवा जाईल, हे कळणारही नाही आणि बादशाही फार काळ टिकणार नाही. आघाडीबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्यवेळी योग्य निर्णय घेतील, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.