राज्यसभेच्या उपसभापतीसाठी राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचे नाव आघाडीवर 

vandana-chavan

टीम महाराष्ट्र देशा : राज्यसभेचे उपसभापती पी.जे.कुरियन यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनात उपसभापती पदासाठी निवडणूक होत आहे. या पदासाठी विरोधी पक्षांमधून वंदना चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे.

राज्यसभेच्या उपसभापती पदासाठी १२३ मतांची गरज आहे. भाजप ६९ जागांसह सभागृहात सर्वात मोठा पक्ष असला तरी एनडीएचा आकडा बहुमतापासून दूर आहे. आपले काही मित्र पक्ष आणि अपक्ष अशी तोडजोड करून ११५ पर्यंत भाजपचा आकडा पोहोचतो. पण १३ खासदार असलेली AIDMK कुठल्या बाजूने मतदान करणार हे स्पष्ट नाही. दरम्यान, वंदना चव्हाण यांची वर्णी जर राज्यसभेच्या उपसभापती पदी लागली तर पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला जाईल यात शंका नाही.

दरम्यान, जेडीयु देखील उपसभापती पद मिळवण्यासाठी हालचाली करताना दिसत आहे. या संदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत . त्यामुळे राज्यसभेच्या उपसभापती पदासाठीची निवडणूक मजेदार ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात