राष्ट्रवादीचा ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस मधील नेत्यांचे पक्षांतर सत्र थांबता थांबेना. राज्यातील राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षांतर केला. आता औरंगाबाद मधील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार भाऊसाहेब चिकटगावकर हे देखील पक्षांतर करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेत आमदार चिकटगावकर अनुपस्थित होते. आमदार चिकटगावकर हे वैजापूरचे विद्यमान आमदार आहे. चिकटगावकर हे भाजप प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाऊसाहेब पाटील यांच्या पक्षांतर मागे त्यांचे व्याही खासदार प्रताप पाटील असल्याचे राजकीय फडात बोलले जात आहे. येत्या काही दिवसातच भाऊसाहेब पाटील यांचा भाजप प्रवेश होणार असल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेला ही भाऊसाहेब पाटील यांनी गैरहजेरी लावली होती. शिवस्वराज्य यात्रा औरंगाबाद मध्ये आली असता एकमेव आमदाराने पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात त्यानंतर त्यांचा पक्षाला रामराम ठोकणार असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हा पासूनच त्यांच्या पक्षतराच्या चर्चेला जोर आला. आता भाऊसाहेब पाटील कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र राष्ट्रवादीला आणखीन एक धक्का बसण्याची शकता वर्तवली जात आहे.